New Yearला घरच्या घरी बनवा टेस्टी ‘आलू पनीर कबाब’, बनवायला २० मिनिटेही नाही लागणार!

Aloo Paneer kebab Recipe: कबाब (Kebab Recipe) हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक डिनर पार्टीमध्ये आवडीने खाल्ला जातो. तसंही आता 2022वर्ष संपायला आणि नववर्ष (New Year Party) यायला, काही तासच उरले आहेत. त्यामुळे तुम्हीही नवीन वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्ये असाल. आणि सेलिब्रेशन म्हटल्यावर चटपटीत, मसालेदार, चविष्ठ तर असणारच. पण यंदाच्या पार्टीला आणखी खास व अविस्मरणीय बनवण्यासाठी जरा हटके आणि चवदार काहीतरी बनवूया. आम्ही तुमच्यासाठी Veg कबाबचा एक प्रकार घेऊन आलो आहोत, आलू पनीर कबाब. (Aloo Paneer Kabab)

आलू पनीर कबाब रेसिपी ही एक सोपी रेसिपी आहे, जी तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसात बनवू शकता. आलू आणि पनीर अशा दोन गोष्टी आहेत, ज्या सर्वांना आवडतात. म्हणून प्रौढांबरोबरच मुलांनाही तुम्ही बनवलेला हा व्हेज कबाब नक्कीच आवडेल.

आलू पनीर कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य
200 ग्रॅम पनीर
3 बटाटे, उकडलेले
1 टीस्पून जिरे पावडर
1/2 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून आले लसूण पेस्ट
1/4 कप ब्रेडचे तुकडे
चवीनुसार मीठ
तेल, आवश्यकतेनुसार
कोट करण्यासाठी
1/2 कप ब्रेडचे तुकडे
1 टीस्पून तीळ (पांढरा)

आलू पनीर कबाब रेसिपी

  1. आलू पनीर कबाब बनवण्यासाठी प्रथम सर्व साहित्य तयार करा. बटाटे प्रेशर कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून उकडायला ठेवा. 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवा.
  2. कुकर उघडा, बटाट्याची साल काढून मॅश करा. पनीरही हाताने मॅश करा.
  3. बटाटे आणि पनीर एका भांड्यात ठेवा आणि मिक्स करा. आता त्यात जिरे पावडर, हळद, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, ब्रेडचे चुरा, मीठ घालून मिक्स करा.
  4. आता कढईत तेल गरम करा. आता मिश्रणाचे गोळे बनवा, त्यावर ब्रेड क्रंब्स लेप करा आणि तीळ घाला.
  5. ते पॅनमध्ये ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
  6. जर तुम्हाला बेक करायचे असेल, तर प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर दोन्ही बाजूंनी 15 मिनिटे शिजवा. सर्व्ह करा.
  7. आलू पनीर कबाब रेसिपी पुदिन्याची चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा. यासोबत मसाला चहाही देता येतो.