रोहित शर्माची टी२० कारकीर्द धोक्यात, सलग दोनदा शून्यावर बाद झाल्याने अडचणीत वाढ

Rohit Shrama Unwanted Record: इंदूरमध्ये काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्व बाद 172 धावा केल्या. 173 धावांचं हे आव्हान भारताने 26 चेंडू शिल्लक राखत पार केलं. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 68 धावा केल्या तर शिवम दुबेने नाबाद 63 धावा केल्या. दोन गडी टिपणारा अक्षर पटेल (Axar Patel) सामनावीर ठरला.

दरम्यान, रोहित शर्मा रविवारी इंदूरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मध्ये पुन्हा एकदा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्याच चेंडूवर तो बोल्ड झाला. फजलहक फारुकीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोहाली टी-20 या मालिकेतील पहिल्या सामन्यातही रोहित खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. बॅक टू बॅक झिरोवर आऊट झाल्यामुळे तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा हा विक्रम आहे.

रोहित शर्मा आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथे आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग पहिल्या क्रमांकावर आहे. पॉलने 13 वेळा शून्यावर विकेट गमावली आहे. म्हणजेच या यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यात रोहित शर्माही मागे नाही. अशा परिस्थितीत तो टी-20 मध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या अवांछित विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका