राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो?

अमरावती : महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे वक्‍तव्‍य शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे.

बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.