आयपीएलचा लिलाव करताना ह्युज एडम्स कोसळले ! पाहा नेमकं कोण आहेत ते?

मुंबई : आयपीएल २०२२ चा लिलाव चालू असताना खेळाडूंचे लिलाव कर्ते ह्युज एडम्स हे स्टेजवरून अचानक खाली कोसळले. त्यामुळे त्याठिकाणी अचानक तणावाचं वातावरण निर्माण झाले आणि आयपीएलचा लिलाव थांबवण्यात आला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाला खरेदी करण्यासाठी सगळेच संघात चढाओढ बघायला मिळत असताना अचानक ही घटना घडली. विशेष म्हणजे ह्युज एडम्स हे चौथ्यांदा आयपीएलच्या खेळांडूचा लिलाव करत आहेत.

लिलाव क्षेत्रातील ह्युज एडम्स हे मोठे तज्ञ मानले जाते. त्यांनी ब्रिटनची राजकुमारी मार्गारेट आणि माजी महाराणी एलिझाबेथ टेलर यांच्या वस्तूंचाही लिलाव केला. ब्रेकफास्ट विथ टिफनी, जेम्स बाँड सारख्या हॉलिवूडच्या सुपरहिट ऐतिहासिक चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव करण्यासाठी देखील ह्यूज ओळखले जातात.

क्रिस्टीज साऊथ केन्सिंग्टन (कलेशी संबंधित वस्तूंचा लिलाव करणारी सर्वात जुनी संस्था) चे आंतरराष्ट्रीय संचालकही त्यांना करण्यात आले. ह्युज एडम्स हे वस्तुचा लिलाव करणारी सर्वात जुनी मानली जाणारी संस्था क्रिस्टीज साऊथ केन्सिंग्टन याचे देखील संचालक होते.

आयपीएल लिलावाच्या पहिल्या सत्रात श्रेयस अय्यरवर १२.२५ कोटी रूपयांची सर्वात जास्त बोली लागली आहे. तर आँस्टेलियाचा धमाकेदार फलंदाज डेव्हिड वार्नरला दिल्ली कँपिटल्स संघाने ६.२५ कोटी देऊन आपल्या ताब्यात घेतले. वेगवान गोलंदाज किगोसो रबाडाला ९.२५ रूपयाची बोली लावून पंजाब संघाने घेतलं आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज फाफ ड्युफलेसिसला आरसीबीने ७ कोटी रुपये देऊन संघात घेतलं आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्ड आता राजस्थान संघाकडून खेळणार आहे. राजस्थान संघाने बोल्डवर तब्बल ८ कोटींची बोली लावली आहे.