Sunil Tatkare | मी खासदार झाल्यास मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातील

Sunil Tatkare | माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला… येणार्‍या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज रेवदंडा येथील कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.

माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते परंतु त्या सभेला जिल्हयातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली असल्याचा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका असे खडेबोल सुनावतानाच स्वतः चे आत्मपरीक्षण करा… तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता सुनिल तटकरे यांच्यावर टिका का करता असा सवालही सुनिल तटकरे यांनी केला.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, कोळी समाजाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा नेते चेतन पाटील, सरपंच प्रफुल मोरे, देवानंद भोईर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ