बॉलीवूडमध्ये मुस्लीम कलाकारांसोबत भेदभाव होतो का? अभिनेत्री हुमा खुरेशीने दिलं असं उत्तर

हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे, जिने वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’पासून ती सतत चर्चेत असते. तिचा ‘तरला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. निर्भीडपणे लोकांसमोर आपली बाजू मांडणाऱ्या हुमाने अलीकडेच बॉलीवूडमध्ये मुस्लिम कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल परखड मत मांडलं आहे.

अलीकडेच, अभिनेत्री आज तकच्या सिधी बात शोमध्ये दिसली, जिथे तिने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यादरम्यान अभिनेत्रीला विचारण्यात आले की इंडस्ट्रीत धर्माबाबत भेदभाव केला जातो का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री हुमा खुरेशी म्हणाली, आज जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा मला आश्चर्य वाटते की लोक असे का बोलतात?

यादरम्यान हुमाला आठवण करून देण्यात आली की, पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांना अमेरिकन मीडियाने भारतातील मुस्लिमांच्या हक्कांबद्दल विचारले होते. यावर तुम्ही काय सांगाल? हे ऐकून अभिनेत्री म्हणाली, ‘भारतात राहत असताना मला कधीच वाटले नाही की मी मुस्लिम आहे, मी वेगळी आहे’.

‘माझे वडील गेल्या 50 वर्षांपासून ‘सलीम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत आहेत. व्यक्तिशः मला असे कधीच वाटले नाही, परंतु काही लोकांना असे वाटू शकते. मला वाटते प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रत्येक सरकारने उत्तरेही दिली पाहिजेत,’ असेही हुमा खुरेशीने म्हटले आहे.