“भाजपाने राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग…”, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे.  राजभवन येथील दरबार हॉलमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Deputy Chief Minister Ajit Pawar) घेतली. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हात मिळवला आहे.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. तर, किरीट सोमय्यांसह भाजपाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वेळोवेळी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटलं, पंतप्रधान मोदींनीही भ्रष्टाचाराचे आरोप केले. याच लोकांबरोबरच भाजपाने सरकार स्थापन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) याच उत्तर भाजपाला विचारलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “याचे उत्तर भाजपाला विचारलं पाहिजे. ‘नॅशनल करप्ट पार्टी’ हे भाजपा आमच्याबद्दल बोलला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादीवर केले आहेत. मग, या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्यापेक्षा भाजपाला विचारले पाहिजे.”