Uddhav Thackeray | ‘मी मोदींना देव मानत नाही’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना मशाल चिन्हावरील उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

भाजपला मोठा गर्व झाला आहे, या गर्वाचं घर आपण खाली करायचंय. भाजपात केवळ दोनच नेत्यांचं चालतं. यावेळी, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींना स्वागतासाठीच्या पुष्पहारातही दुसरा माणूस चालत नसल्याचे सांगत राजनाथसिंह यांचे उदाहरणही दिले. अमित शाह तुम्ही जर कोणत्या दैवताला मानत असाल, मोदी सोडून. मोदीला मी देव मानत नाही, मी माझ्या आई भवानीला देवी मानतो, देवता मानतो. ती आमची आई आहे. तिच्या साक्षीने, तिची शपथ घेऊन मी जनता जनार्दनाला सांगतो की, भाजपाने माझ्या, आपल्या पाठीत वार केला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा