Breaking : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर नार्वेकरांनी केला जाहीर

Shivsena MLA Disqualification Case Verdict : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकालानुसार पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.