नवाजुद्दीनच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! आईने सुनेविरोधात केली FIR; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई- प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या कुटुंबातील वाद सध्या चर्चेत आहे. नवाजुद्दीनची आई (Nawazuddin Siddiqui Mother) मेहरूनिसा सिद्दीकी आणि त्याची पत्नी (Nawazuddin Siddiqui Wife) जैनब उर्फ आलिया सिद्दीकी यांच्यात सर्वकाही अलबेल नाही. त्या दोघींमध्ये संपत्तीवरून वाद झाला असल्याचे समजत आहे. या वादावरुनच नवाजुद्दीनची आई मेहरूनिसा यांनी त्यांची सून जैनबविरोधात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी जैनबला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे.

नवाजुद्दीनच्या आईच्या तक्रारीच्या आधारे मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्याची पत्नी जैनबविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीविरुद्ध आयपीसी कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनच्या आईने आरोप केला आहे की, जैनब यापूर्वी बंगल्यात गेली होती, जिथे तिचा अभिनेत्याच्या आईसोबत वाद झाला होता. वादात काय झाले ते समोर आलेले नाही. मात्र नवाजुद्दीन, त्याची आई आणि पत्नी यांच्यात मालमत्तेवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील हा वाद जुना आहे.

जैनबने नवाजुद्दीनला दिलाय घटस्फोट
नवाजची पत्नी जैनब सिद्दीकीने मे २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर नवाजच्या भाचीने त्याचा भाऊ मिनाजुद्दीन सिद्दीकीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. एवढेच नाही तर जैनबने नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी याच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. यानंतर शमासने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तो १४ सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आला होता.

नवाजुद्दीन आणि जैनबचे २०१० मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. पण जैनब ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.