‘मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही’

पुणे – वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.

आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री (Savitri of Satyavana) फार लवकर समजली, परंतु जोतिबाची सावित्री अजून समजली नाही, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी (Widowhood ban) करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बोलत होत्या. समाजात अनेक अनिष्ट प्रथा परंपरा (Undesirable practice tradition प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव (Resolution on Widowhood) करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.