Dr. Mukesh Batra | पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी सर्वोत्तमतेची ५० वर्षे साजरी केली

पुणे | होमिओपॅथी विश्‍वातील विश्‍वसनीय नाव पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा (Dr. Mukesh Batra) सर्वांगीण उपचाराप्रती त्‍यांच्‍या स्थिर समर्पिततेच्‍या ५० वर्षांना साजरे करत आहे, जेथे संपूर्ण विश्‍व होमिओपॅथीचे संस्‍थापक जर्मन फिजिशियन डॉ. सॅम्‍युएल हॅनेमन यांच्‍या जयंतीला साजरे करत आहे. डॉ. बत्रा होमिओपॅथिक हेल्‍थकेअरच्‍या दर्जामध्‍ये क्रांती घडवून आणण्यात साह्यभूत राहिले आहे.

गेल्‍या पाच दशकांमध्‍ये डॉ. मुकेश बत्रा (Dr. Mukesh Batra) यांनी त्‍यांच्‍या डॉ. बत्रा’ज ग्रुप कंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून रूग्‍ण केअर दर्जा सुधारण्‍यासाठी नाविन्‍यता व तंत्रज्ञानाचा फायदा घेत होमिओपॅथीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्‍याधुनिक होमिओपॅथिक उत्‍पादने सादर करण्‍यापासून आपल्‍या सेवांमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सचा समावेश करण्‍यापर्यंत डॉ. बत्रा’ज सतत पारंपारिक उपचार पद्धतींच्‍या मर्यादांना दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. तसेच सर्वांगीण वेलनेसप्रती त्‍यांची कटिबद्धता होमिओपॅथीपलीकडे देखील आहे. सादर करण्‍यात आलेल्‍या एस्‍थेटिक सर्विसेससह शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुदृढ करण्‍याचा मनसुबा आहे.

डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्‍यक्ष व संस्‍थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्‍हणाले, ”गेल्‍या ५० वर्षांमधील माझ्या प्रवासाला सर्वांगीण उपचाराप्रती सखोल आवड आणि रूग्‍णांप्रती अविरत समर्पिततेमधून प्रेरणा मिळाली आहे. अनेक व्‍यक्‍तींचा आजार बरे करणारा उपचार म्‍हणून होमिओपॅथीवर, तसेच माझ्यावर विश्‍वास नव्‍हता, ज्‍यामुळे हा प्रवास खूप आव्‍हानात्‍मक होता. पण माझ्या रूग्‍णांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आणि यामधूनच मला पुढे जात राहण्‍यास प्रेरणा मिळाली. त्‍यांना आनंदी व आरोग्‍यदायी पाहून मला त्‍यांच्‍यासाठी अधिक सर्वोत्तम उपचार पद्धतींचा शोध घेण्‍यास स्‍फूर्ती मिळाली. मी माझे सहकारी, कर्मचारी व कुटुंबियांचे त्‍यांनी दिलेल्‍या पाठिंब्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करतो, जे आव्‍हानात्‍मक काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी या प्रवासामध्‍ये मदत केलेल्‍या सर्वांचे आभार मानतो.”

डॉ. बत्रा’ज हेल्‍थकेअरचे भारत, बांग्‍लादेश, यूके, यूएई व बहरीन या ५ देशांमधील १६० शहरांमध्‍ये २०० हून अधिक क्लिनिक्‍सचे नेटवर्क आहे. विविध क्षेत्रांमध्‍ये विशेषीकृत असलेल्‍या ३५० हून अधिक अनुभवी डॉक्‍टरांच्‍या टीमसह डॉ. बत्रा’जने जगभरातील १ दशलक्षहून अधिक रूग्‍णांवर उपचार केले आहेत. द इकॉनॉमिक टाइम्‍सद्वारे ‘आयकॉन ऑफ इंडिजिनिअस एक्सलन्स इन हेल्थकेअर’ म्‍हणून मान्‍यताकृत डॉ. बत्रा’ज केस, त्‍वचा, अॅलर्जीज, मानसिक आरोग्‍य, महिलांचे आरोग्‍य अशा विविध आजारांसाठी सर्वसमावेशक आरोग्‍यसेवा सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात