मला राज्याला पुढे न्यायचं आहे, भोंगा हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला.

ते म्हणाले,भोंग्यांचा मुद्दा हा गाजलेला नाही कारण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो देशासाठी. लाॅकडाऊन (Lockdown), नोटाबंदी (Denomination) देशभर केली तशी भोंगा बंदी देश भर करा. त्यात केंद्र सरकार पण प्रतिवादी होते. तो निकाल सर्व धर्मीयांना लागू होतो. नुसतेच भोंगे काढा अस नाहीए मग सर्वधर्मीयांनाच ते पाळावे लागेल. भोंगा हा मुद्दा गौण आहे. माझ्या समोर राज्याला पुढे न्यायचे आहे याला प्राधान्य, गुंतवणूक वाढवायची थांबलेले अर्थ चक्र परत फिरवायचे आहे हे मोठे आव्हान आहेत.

उत्तर प्रदेशने भोंगे काढले परंतु जे परवानगी मागतील त्यांना परवानगी देऊन ते परत चढणार आहेत. सर्वांनाच परवानगी लागणार आणि डेसिबल पाळावे लागणार. ज्यांना अजान आणि आवाज यांच्यातला फरक कळत नाही ते अजाणतेपणाने बोलताहेत. अजाणच्या पाठीमागून अजाणतेपणाने जे सुरु आहे ते जाणून घ्या.असं ते म्हणाले.