संसदेतील महिला आरक्षणावर शहनाज गिलची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मुलीला नेहमीच…’

Nari Shakti Vandan Bill – आज सकाळी नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली. महिला आरक्षणविषयक नारीशक्ती वंदन (Women Reservation Bill) विधेयकावरील चर्चेला सदनात प्रारंभ झाला. दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaz Gill) हिने या विधेयकाबद्दल आपले मत मांडले आहे.

शहनाजनं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, मोदींनी जे पाऊल उचलले आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. त्याचे आपण सर्वांनी स्वागत करायला हवे. आपण जर सर्वांनी योग्य वागणूक आणि योग्य न्याय, समान आदर अशी भावना जपली तर त्याचा सर्वांनाच फायदा होईल. याची सुरुवात आपल्या घरातूनच व्हायला हवी. आपल्याला सारखेपणानं वागवलं जातंय याचा आनंद आहे.

मुलीला नेहमीच शिकवलं जातं की, लग्न करायचं आणि संसार करायचा. पण आता मुलींना समान न्यायपद्धतीनं वागवलं जाणं मोठी गोष्ट आहे. त्याचा पुन्हा एकदा नव्या प्रकारे विचार होतो आहे. याचे समाधान आहे. असेही शहनाजनं म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास