तुमचाही मुसेवाला करू; सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचं पत्र

मुंबई – पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला (Punjabi rapper Sidhu Musewala) याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या (Murder by shooting() करण्यात आली. अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Actor Salman Khan and his father Salim Khan) यांना धमकी (Threat) देणारं पत्र मिळालं आहे. ‘सलमान और आपका बहुत जल्द मुसेवाला होगा’ (सलमान आणि तुमचा लवकरच मुसेवाला होणार) अशी धमकी चिठ्ठीतून देण्यात आली आहे.

सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime at Bandra Police Station) दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी (Morning walk) गेलेले सलीम खान वांद्र्यातील बँड स्टँड इथं नेहमीचे बेंचवर बसले असता कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांना आणि सलमान खानला चिट्ठीद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाद्वारे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला असून अज्ञात इसमाविरोधात कलम 506 (2) भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर सलमान खानची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं (Lawrence Bishnoi) पुढं आलेलं नाव. काही वर्षापूर्वी लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच सलमानच्या घराभोवती पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलीये.