उत्तरकाशी दुर्घटना : जाणून घ्या यात्रेकरूंनी भरलेली बस खड्ड्यात कशी पडली? 

उत्तरकाशी  – उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील दामताजवळ यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत (Bus Full of passengers fell in to pit) कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे. ही माहिती देताना उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, तेथे शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. या बसमध्ये २८ यात्रेकरूंसह एकूण ३० जण होते. हे सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशातून उत्तराखंडला त्यांच्या प्रवासासाठी आले होते. अशा परिस्थितीत २६ जणांचा बळी घेणारा एवढा मोठा अपघात कसा घडला, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांसह आणि जखमींचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही होते. शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितले की, या अपघातात जखमी झालेल्या चालकाच्या म्हणण्यानुसार, बसचे स्टेअरिंग निकामी झाल्याने त्याचे नियंत्रण सुटले (The bus lost control due to steering failure) आणि हा अपघात झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव आज खजुराहो येथे पाठवून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी, स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिखानू येथील दरीजवळ ही बस ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी रस्ता बराच रुंद आहे. अशा स्थितीत येथे वाहने भरधाव वेगाने जातात. त्यांनी सांगितले की, यात्रेकरूंनी भरलेली ही बसही वेगात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या वाहनावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसचा वेग जास्त असल्याने ती रस्त्यावरून बाहेर पडून 500 मीटर खोल दरीत कोसळली.