जाणून घ्या शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळेबाज हर्षद मेहताचे कुटुंब आज काय करत आहे?

मुंबई – आज आम्ही तुम्हाला मालिकेबद्दल नाही तर हर्षद मेहताच्या (Harshad Mehta) मृत्यूनंतर खऱ्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाविषयी काय घडलं याबद्दल सांगणार आहोत. 2001 मध्ये हर्षद मेहताचा पोलीस कोठडीत मृत्यू (Harshad Mehta dies in police custody) झाला, पण त्यानंतर त्याच्या कुटुंबाला दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. 2019 मध्ये हर्षदच्या पत्नीने स्टॉक ब्रोकर किशोर जननी आणि फेडरल बँकेविरुद्ध (Stock broker Kishor Janani and Federal Bank) केसही जिंकली. 1992 पासून हर्षदचे 6 कोटी रुपये ज्योतीला 18% व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हर्षदचा भाऊ अश्विन मेहता (Ashwin Mehta) याने 50 व्या वर्षी कायद्याची पदवी मिळवली आणि आता मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. त्याने अनेक न्यायालयीन खटले एकट्याने लढवले आणि आपल्या भावाचे नाव साफ करण्यासाठी सुमारे 1,700 कोटी रुपये बँकांना दिले. तो हर्षदचा वकील तसेच त्याच्या फर्ममध्ये स्टॉक ब्रोकर होता. 2001 मध्ये हर्षद मेहताच्या मृत्यूनंतर, त्याच्याविरुद्धचा खटला संपुष्टात आला, परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) फसवणूक केल्याच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता करेपर्यंत अश्विनने 2018 पर्यंत कायदेशीर लढाई लढत राहिली.

बिझनेस स्टँडर्ड (Business standard) मधील एका अहवालानुसार, हर्षदचा मुलगा अतुर मेहता (Harshad’s son Atur Mehta) याने 2018 मध्ये लोकांचे लक्ष वेधून घेतले जेव्हा त्याने BSE-सूचीबद्ध टेक्सटाईल कंपनी फेअर डील फिलामेंट्समध्ये महत्त्वपूर्ण भागभांडवल विकत घेतले. हर्षद मेहताची कहाणी खूप रंजक आहे. त्याच्या आयुष्यात असे अनेक पदर आहेत, जे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेब सीरिज बघायची आहे किंवा त्याच्याबद्दल वाचायचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की हर्षद मेहता लोकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहील.