राज्यसभा निवडणुकीत समाजवादीची मते मविआला मिळणार नाहीत ? अबू आझमींनी पत्र लिहित केली नाराजी व्यक्त 

Mumbai –   शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. तसेच अपक्दष आणि छोट्रया पक्म्याषांच्नया मतांना देखील अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सपा नेते आणि आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकार सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी ज्याची चर्चा उद्धव ठाकरे हल्ली फारवेळा करतात ते एकदा सांगाच असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही मुस्लिमांचे कोणते प्रश्न सुटले? ५ टक्के रिझर्व्हेशन, हज कमिटीच्या सीईओची नियुक्ती , मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना, वक्फ बोर्ड स्थापन करणं, उर्दू अकादमी, अल्पसंख्याक विभागाचा विकास, अल्पसंख्याक समुदायाचे व्यवसाय जसे की पॉवरलूम, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न, अल्पसंख्याक समुदायासाठीची धार्मिक स्थळं, त्यासाठी मिळणारं बजेट अशा सगळ्या मुद्द्यांचं काय झालं? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे.असं आझमी यांनी म्हटले आहे.