Dr. Ajay Taware | ‘ मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावे सांगेन ‘, डॉ. अजय तावरेंच्या इशाऱ्याने पुण्याचे वातावरण तापलं

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या दोघांचीही कसून चौकशी करत आहेत. पोलीस चौकशीदरम्यान तावरेनं मोठं वक्तव्य केलेय. ‘मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन’ असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पोलिस चौकशीदरम्यान अजय तावरे (Dr. Ajay Taware) यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय. तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय. डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप