माझ्यासारखा असता तर खालच्या पदावर आलाच नसता; पटोलेंचा फडणवीसांना टोमणा 

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात एकामागून एक भूकंप घडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) हे मात्र शांत असल्याचे चित्र आहे. मात्र आता याच देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे.  चंदगडमध्ये (Chandgad) बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे.आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील यावर भाष्य केले आहे.  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो तसा पुन्हा आलो आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण पुन्हा आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्रपदावर आले, माझ्यासारखा असता तर खालच्या पदावर आलाच नसता असा टोला मारत कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार की नाही याची चिंता करण्याऐवजी फडणवीसांनी भाजपा कर्नाटकात सत्तेत येईल का? याची जास्त चिंता करावी, असेही पटोले म्हणाले.