IndiaVsPakistan : ‘तुम्ही नेहमीच…’ अभिनेता उदयनिधी स्टॅलिन भारतीयांवर ओरडला, पाकिस्तानच्या बाजूनं बोलला!

Udhaynidhi Stalin ON INDvsPAK Match: अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात (India vs Pakistan) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाने बाबर आझमच्या (Babar Azam) संघाचा सात गडी राखून पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जय श्री रामच्या (Jay Shri Ram) घोषणाही ऐकू आल्या, त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन संतापले. या घोषणाबाजीवर त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. उदयनिधी यांनी एक्सवर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली असून चाहत्यांना लक्ष्य केले आहे.

काय म्हणाले उदयनिधी?
उदयनिधी यांनी ट्विट करून म्हटले, भारत आपल्या क्रीडा भावनेसाठी आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक अस्वीकार्य आणि अत्यंत खालच्या पातळीची आहे. खेळ ही देशांना एकत्र आणणारी शक्ती बनली पाहिजे. तसेच खऱ्या बंधुभावाचा प्रसार झाला पाहिजे. द्वेष पसरवण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर करणे निषेधार्ह आहे, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

सामन्यादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली
खरं तर, सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. मोहम्मद रिझवानसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना टीकेला सामोरे जावे लागले. याशिवाय सामन्यादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाशी संबंधित पोस्टर्सही समोर आले होते. यावर इस्रायलचे प्रत्युत्तरही आले.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा