“मला मोदींचे हात मजबूत करायचे आहेत, म्हणून शिवसेना…”, मिलिंद देवरा यांचे मोठे वक्तव्य

Milind Deora:- ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ५५ वर्षांनंतर काँग्रेसची साथ सोडताना मिलिंद देवरा भावूक झाले.

आजचा दिवस माझ्यासाठी भावूक आहे. इमोशनल आहे. मी काँग्रेस सोडेल असं वाटलं नाही. मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे 55 वर्षाचे जुने नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासाचं राहिलं आहे. विधायक राहिलं आहे, असं माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा म्हणाले.

माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत मेहनती आहेत. सर्वांना उपलब्ध असतात. जमिनीवरचे नेते आहेत. सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना माहीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं त्यांचं व्हिजन मोठं आहे. त्यामुळे मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. यशस्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे देशाचं व्हिजन आहे. त्यामुळे मला शिवसेनेचे हात मजबूत करायचे आहेत, असं मिलिंद देवरा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार