‘भाजप कार्यालयात पहारा ठेवायचा असेल तर मी अग्निवीराला प्राधान्य देईन’

नवी दिल्ली – केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(agnipath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी अग्निवीरांबद्दल असे काही बोलले आहे, ज्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. इंदूरमध्ये कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, जर आम्हाला भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक ठेवायचे असतील तर आम्ही त्यातही याच दलाला प्राधान्य देऊ.

कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले की, हा राजकीय निर्णय नाही. लष्करप्रमुख आणि त्यांच्या तिन्ही सेनादलांनी (Army) सरकारला ही सूचना केली आहे. त्यानंतर ही योजना आणली आहे. कारगिल युद्धानंतर (Kargil War) आयोगाने सरकारला जो अहवाल दिला होता, त्या अहवालात आपल्या देशाच्या सैनिकांचे वय कमी करण्यात यावे आणि तेव्हापासून ही प्रक्रिया जवळपास 20 वर्षे सुरू आहे. हा एका दिवसाचा निर्णय नाही. पण ज्या प्रकारे काँग्रेसला आपल्या वक्तव्यांनी देश पेटवायचा आहे.