राम रहीम असे नाव दिले असते तर भारताची धर्मनिरपेक्षता ही चंद्रावर …; राष्ट्रवादीचे रडगाणे झालं सुरु

Chandrayan – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी बेंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले . चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यासोबतच संपूर्ण देशवासियांचा ऊर भरून येईल आणि सर्वांनाच अभिमान वाटेल अशा तीन घोषणा देखील मा. मोदींनी केल्या आहे.

ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे, त्या पाँईटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाईल. चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे. याशिवाय भारत दरवर्षी 23 ऑगस्ट हा ‘नेशनल स्पेस डे’ म्हणून साजरा करेल अशी घोषणा देखील केली आहे.

दरम्यान, मोदींनी केलेल्या या घोषणेचे शास्त्रज्ञांनी स्वगत केले असले तरीही राष्ट्रवादीने मात्र यावरून राजकारण सुरु केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक ट्वीट केले आहे. यात पंतप्रधानांनी राम रहीम असे नाव दिले असते तर भारताची धर्मनिरपेक्षता ही चंद्रावर देखील पोचली असा आदर्श जगासमोर ठेवता आला असता अशी मागणी करत राष्ट्रवादीने आपले रडगाणे सुरु केले आहे.