राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? 

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

जर न्यायालयात राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर सीमा वाद का नाही. सरकारच्या इंटरेस्टचे प्रश्न सुटू शकतात. मात्र सीमा प्रश्न असेल, महाराष्ट्रच्या बेकायदेशीर सरकारचा प्रश्न असेल त्यावर तारखा तारखा येतात त्यामुळे संशय निर्माण होतं आहे, अशी शंका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सर्वात जास्त चटके देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सासूरवाडी कोल्हापूरला बसतो आहे. यामुळे गृहमंत्र्यांनी या प्रश्नावर मध्यस्ती करावी आणि सकारात्मक मार्ग काढावा अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी गुरुवारी व्यक्त केली.

सरकारच्या इंटरेस्टचे विषय न्यायालयात सुटतात, पण सीमाभाग (maharashtra karnataka border dispute) असेल, राज्यातील बेकायदेशीर सरकार असेल, त्याला तारखा पडताहेत. म्हणून लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतून काही चांगल निघणार असेल, तर आम्ही स्वागत करतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले.