अभिनेत्री कॅटरिना कैफ प्रेग्नंट? वर आलेले पोट पाहून चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच पार पडला. या जोडप्याने लग्न केल्यापासून अनेकदा कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीच्या अफवा उडाल्या आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा असेच काहीसे घडताना दिसत आहे.

अभिनेत्री कॅटरिना अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती, ज्यामध्ये तिने सिल्व्हर रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत होती. पण, हा ड्रेस आता कॅटरिनासाठी समस्येचे कारण ठरला आहे. या ड्रेसमुळे अभिनेत्री प्रेग्नंट (Katrina Kaif Pregnancy) असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अवॉर्ड शोमध्ये कॅटरिनाने सिल्व्हर कलरचा थाई-हाई स्लिट गाऊन घातला होता. ज्याला प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती. तिने केस मोकळे सोडत तिचा लूक पूर्ण केला होता. अॅक्सेसरीजबद्दल बोलायचे तर तिने कानात मोठे हूप्स घातले होते, याशिवाय कॅटरिनाने कोणतेही दागिने घातले नव्हते. तथापि, व्हिडिओमध्ये कॅटरिना तिच्या वर आलेल्या पोटामुळे प्रश्नांच्या घेऱ्यात सापडली आहे.

कॅटरिना कैफचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅटरिनाचे पोट थोडेसे वर आलेले दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ‘ही पंजाबी खाण्याची कमाल आहे आहे की पोटात बाळ आहे?’ दुसऱ्याने लिहिले – ‘कॅटरिना प्रेग्नंट दिसत आहे.’