Ajit Pawar | शेवटचे सात दिवस फक्त खडकवासल्यासाठी राखून ठेवा, अजित पवारांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सूचना

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या खडसवासला विधानसभा मतदारसंघात आता मोड्या घडामोडी घडतांना दिसत आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी महायुतीतील नेतेमंडळी चांगलेच कामाला लागले आहेत. यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयचं उद्घाटन केलं. यावेळी अजितदादांनी महायुतीच्या नेत्यांना बारामतीसाठी सात दिवस राखून ठेवण्याचा महत्वाचा आदेश दिला आहे.

महायुतीचे जिल्ह्यात चार उमेदवार असून पहिली निवडणुक बारामतीसाठी होणार आहे. त्यामुळे प्रचारातही खडकवासल्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीलाच प्राधान्य द्यावे. प्रचाराचे सातत्य टिकवण्यासाठी एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा. त्यानंतर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे नियोजन करावे, अशी सुचना पवारांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्यात.

यातच खडकवासला मतदारसंघात १२६४ सदनिका असून काही सोसायट्यामध्ये पाच-पाच सदनिका आहेत. यातच रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न अशा सुटणाऱ्या समस्या या भागात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. त्यामुळे प्रचाराला जाताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा शब्द नागरिकांना द्यावा. असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळालं आहे. यातच आता सुनेत्रा पवारांना किमान १ लाखांचं मताधिक्क मिळण्याचे उद्दिष्ट महायुतीच्या नेत्यांना ठेवलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन