विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्न जर मांडायचा होता तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होता – वळसे पाटील

मुंबई : राज्यातील आगामी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसाठी मुंबई आणि पुण्यासह, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, नागपूर आणि अकोला शहरात विद्यार्थ्यांनी काल आंदोलन केलं. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थाना बाहेरही विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात आल्यामुळे विषयांचं हवं तसं आकलन झालं नाही, परिणामी परीक्षा रद्दच करावी अथवा ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रामुख्यानं विद्यार्थ्यांकडून होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले,विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेल आहे ते आंदोलन माझ्या दृष्टीने योग्य नाही या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्न जर मांडायचा होता तर त्यांनी सरकारकडे मांडला पाहिजे होता .

मी पोलीस विभागाला आदेश दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या गेल्या दोन दिवसांमध्ये वेळेवर वायरल झालेल्या हे ठरवून केलेलं कुठल्यातरी संघटनेचे कृत्य आहे त्याच्यावर आम्ही पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा त्याच्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री आणि माजी मुख्यमंत्री हे मार्ग काढतील विद्यार्थ्यांना माझा आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं अभ्यास करावा आपल्या हिताचे काही सरकारला पण आहेत सरकार पैसे देशांमध्ये आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली