Sunetra Pawar | उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांचा संयुक्त दौंड दौरा, अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बुधवारी दौंड तालुक्याचा दौरा केला. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यांनी दौंड तालुक्यात संयुक्त दौरा केला. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख नेते एकवटल्याचे चित्र दिसून आले.

तालुक्यातील खडकी येथून पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राहूल कुल यांनी मतदारांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच