‘भाजपानं पक्षबदलासाठी आर्थिक ऑफर दिली म्हणणाऱ्या आमदारांची लाय डिटेक्टर टेस्ट करा’

नवी दिल्ली- दिल्लीत भाजप विरुद्ध आप असा संघर्ष सध्या सुरु आहे. यातच भाजपकडून आम आदमी पक्षाच्या आमदारांना पक्ष बदलण्यासाठी आमिष दाखवले जात असल्याचा आरोप आप कडून केला जात आहे. यावरूनच आता भाजप आक्रमक झाली असून पक्षबदलासाठी पैसे देण्याची ऑफर दिल्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या आमदारांची लाय डिटेक्टर टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दिल्लीमधील भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी केली आहे.

ते म्हणाले, जोपर्यंत पैशांची ऑफर देणारे कारागृहात जाणार नाहीत, तोपर्यंत आमच्या वेदना संपणार नाहीत. ते दिल्लीमधील आमदार असून, पैशांची ऑफर देणाऱ्यांचा शोध घेण्यास मदत करु . त्यांच्या चार आमदारांना स्क्रिप्ट देण्यात आली आहे. कधी ते माजी खासदाराने तर, कधी माजी आमदाराने ऑफर दिल्याचं सांगतात. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घरांमधील सीसीटीव्ही आणि त्यांचे मोबाइल तपासावेत जेणेकरुन सत्य समोर येईल, असंही परवेश वर्मा यांनी म्हटलं आहे.त्यांची लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण नार्को टेस्टमध्ये तुम्ही विसरला असलात तरी काय झालं होतं हे सांगू शकता, असं वर्मा यांनी सांगितलं.