आधीच हार्दिकच्या फिटनेसची चिंता, आता ‘हा’ हुकमी एक्का देखील होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर ?

नवी दिल्ली : टी-२० विश्वकप स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच देशाने आपले १५ सदस्यीय संघ जाहीर देखील केलेत. पण अशात भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. आधीच हार्दिक पांड्याच्या फिटनेस बद्दल चिंता सतावत असताना सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) आयपीएलमध्ये खेळत असलेला ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीच्या गुडघ्याची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे.

वरुण चक्रवर्तीला आगामी टी -20 विश्वचषकात भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून पहिले जात आहे, परंतु बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला तामिळनाडूच्या या फिरकीपटूवर मेहनत घ्यावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत भारतीय संघात बदल केले जाऊ शकतात, परंतु गुडघ्यांची समस्या असूनही वरुणच्या गोलंदाजीचा विचार करता तो खेळणार हे निश्चित आहे.

वरुणच्या गुडघ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. त्याच दुखण वाढत आहे, पण जर टी 20 विश्वचषक नसता तर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला खेळवण्याचा धोका पत्करला नसता. असे बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c

You May Also Like