हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा – नवाब मलिक

मुंबई   – विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत. यातच आता महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.

अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा असेही नवाब मलिक म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे. विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.