‘शिवसेना आमदार भास्कर जाधव ने उगाच स्वतःचं ढुंगण शेकून घेतलं’

 मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे अतिउत्साही आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.

भास्कर जाधवांनी माफी मागावी नाहीतर त्यांचं निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. चौफेर टीका होऊ लागल्याने तसेच सर्वबाजूंनी कोंडी होत असल्याचे पाहून सुरुवातीला कडक भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधवांनी नंतर बिनशर्त माफी मागत असल्याचं सांगत विषयावर पडदा टाकला.

दरम्यान, भाजपनेते निलेश राणे यांनी याच मुद्यावरून जाधव यांच्यावर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, काल शिवसेना आमदार भास्कर जाधव ने उगाच स्वतःचं ढुंगण शेकून घेतलं, पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय. इतकी भीती वाटते तर लायकीत राहून तोंड उघडायचं, त्याला माहित असावं माफी नाही मागितली तर फटके मिळतील म्हणून शहाणा झाला अशी टीका राणे यांनी केली आहे.