‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे’

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार  पुन्हा गुवाहाटी (Shinde Group Guwahati Tour 2022) दौऱ्यावर  गेले आहेत. महाराष्ट्राचं सत्तानाट्य (Maharashtra Politcal Crisis) जिथून सुरू झालं, त्याच भूमीत परत जाऊन शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेतील.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या वाजूला आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे, अशी जहरी टीका खासदार जाधव यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत. त्यामुळे चांगली लोकं हळूहळू दूर जातील, असा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांचा एक गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर देखील शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे. ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत, असं खासदार जाधव म्हणालेत.