तुळजा भवानी देवीचा सोन्याचा मुकुट आणि दागिने चोरी प्रकरणी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा

Neelam Gorhe: नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधान परिषदेत सदस्य महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत. यामधील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याबाबत औचित्याचा मुद्दा जानकर यांनी उपस्थित केला.

यावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे याविषयाकडे लक्ष वेधले. तसेच सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देवून ही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे शासनास निर्देश दिले.

यावर मंत्री महोदय गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल असे सभागृहाला आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत