नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांचे छायाचित्र कधी येणार?

Vikram Sampat: नोटेवर कधीपर्यंत केवळ एकाची व्यक्तीचे छायाचित्र किती दिवसांपर्यंत राहणार आहे. नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांचे छायाचित्र कधी येणार, याची प्रतीक्षा आहे, असे मत प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर समज – गैरसमज ‘ या विषयावर संपत बोलत होते. उद्योजक अमित परांजपे यांनी संपत यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.

संपत म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राज्याच्या बाहेरील लोकांबद्दल माहिती नाही. त्यांच्याबद्दल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) पुस्तकांत माहिती नाही. ही परिस्थिती असतानाच, आपल्या इतिहासात ठराविक लोकांनाच स्थान दिले असून, इतरांना डावलले आहे, असे स्पष्ट होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, असे संपत यांनी सांगितले.संपत म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वापर राजकीय पक्षांनी केवळ आपल्या फायद्यासाठी केला आहे. पक्षांनी निवडणुकीत, जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यांच्या पूर्ततेबाबत तत्परतेने कार्यवाही केली नाही, अशी खंत संपत यांनी व्यक्त केली. संपत यांनी सावरकर यांच्या संपूर्ण प्रवासाबाबत माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा इतिहास माहिती नसतांनाही काही व्यक्ती त्यांच्यावर टीका करीत असतात. सावरकर यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा विरोध करा. मात्र, त्यांच्याबाबतचे तथ्य जाणून घ्या आणि त्यानंतर आपले मत व्यक्त करा, असे आवाहन संपत यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत