गणेशोत्सवासाठी भविष्यात विमानाचीही सोय करू – नितेश राणे

मुंबई – कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्ष राज्यासह देशावर करोनाचे संकट होते. दोन वर्षांपासून मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा सर्व सणांवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत बोलताना गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी विशेष ट्रेन, बसची सोय करण्यात येत आहे. पुढच्या काळात बस आणि ट्रेनच नाही तर विमानही सोडू, असं वक्तव्य आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केलं आहे.

नितेश राणे म्हणाले, यंदा कोकणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत नाही. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जात आहेत, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार.