कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी पिकांच्या सिंचनासाठी ‘या’ दिवसापासून सुटणार आवर्तन

kukadi

पुणे : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा, घोड शाखा कालवा व पिंपळगाव जोगे कालव्यात तर मिना शाखा कालव्यात २० डिसेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सिंचनभवन येथे झालेल्या बैठकीला आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.

कुकडी प्रकल्पामध्ये ३ डिसेंबर २०२१ रोजी २३.८९ टीएमसी (८०.५१ टक्के) पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून बाष्पीभवन, पिण्याचे पाणी, आरक्षण, विभागणी साठा, इत्यादीसाठी लागणारे पाणी वजा करता रब्बी हंगाम नियोजनासाठी १५.२० टीएमसी पाणी नियोजनासाठी उपलब्ध आहे.

प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून प्रकल्पातील सर्व कालव्याचे एक आवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालवानिहाय रब्बी आवर्तन सुरू करण्याच्या तारखाही ठरविण्यात आल्या. कुकडी डावा कालवा १ जानेवारी २०२२, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा, पिंपळगाव जोगे डावा कालवा २५ डिसेंबर २०२१ व मिना शाखा कालव्यातून २० डिसेंबर २०२१ रोजी आवर्तन सुरू करण्यात येईल. याबरोबरच डिंभे डावा कालवा, मिना पुरक कालवा हे कालवे आणि कुकडी, मिना व घोड नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधाऱ्याचे आवर्तन आवश्यकतेनुसार सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कुकडी प्रकल्पातील कालव्यांची  माझा कालवा माझी जबाबदारी" उपक्रमांतर्गत स्वच्छता केल्याने कालव्यांची वहनक्षमता वाढली आहे. अशा परिस्थितीत आवर्तनादरम्यान पुरेशा दाबाने पाणी मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग काटकसरीने व कार्यक्षमतेने करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री jजयंत पाटील यांनी केले. कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=9AClnOdM8GQ

Previous Post
covid-19

महाराष्ट्राला मोठा दिलासा, ‘त्या’ ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह

Next Post
nilam gorhe

महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग – नीलम गोऱ्हे

Related Posts
दफनभुमींची नाेंद महापािलकेकडे करणे बंधनकारक, ५०हून अधिक दफनभुमींची नोंदच नाही

दफनभुमींची नाेंद महापािलकेकडे करणे बंधनकारक, ५०हून अधिक दफनभुमींची नोंदच नाही

पुणे- महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मालकीच्या माेजक्या दफनभुमी असुन, काही दफनभुमी या काही ट्रस्ट, समाज, खासगी मालकीच्या जागेत…
Read More
Vijay Shivtare-Uddhav Thackeray

राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली – शिवतारे

मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) ठाकरे गटावर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत…
Read More

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची ‘दि डेली मेल’ला माहिती

दावोस : महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज…
Read More