प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत भाजपच्या  विविध आघाड्यांचा मेळावा

परळी वैजनाथ  – मोदी @9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत उद्या २५ जून रोजी खासदार डॉ.प्रितम  मुंडे (MP Dr. Pritam Munde) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर भाजपच्या वतीनं महा जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत.

उद्या रविवारी २५ तारखेला सकाळी ११ वा. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परळी मतदारसंघातील भाजपच्या विविध आघाडया ज्यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, दलित, अल्पसंख्याक मोर्चा, दिव्यांग सेल अशा विविध आघाडयांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास खा. डाॅ. प्रितम मुंडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार  आहेत, या मेळाव्यास भाजप तसेच आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महा जनसंपर्क अभियान समितीने केले आहे.