मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना गर्भित इशारा दिला.

देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून प्रत्युत्तर दिले आहे.

“मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.