IND vs NZ: शमी वादळाचा न्युझीलंडला तडका, विश्वचषकात इतिहास रचला; अनिल कुंबळेचाही मोडला विक्रम

IND vs NZ World Cup Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकातील २१ वा सामना होत आहे. हा सामना भारतीय संघाला उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करुन देऊ शकतो. मात्र या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे डॅरी मिशेल आणि रचिन रविंद्र भारतीय गोलंदाजांवर भारी पडले. परंतु वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने त्यांच्या खेळींवर अंकुश लावला आणि २७३ धावांवर न्यूझीलंडला सर्वबाद केले. भारताला आता विजयासाठी २७४ धावांचे आव्हान मिळाले आहे.

न्यूझीलंडकडून मिशेलने १२७ चेंडूत १३० धावांची शानदार शतकी खेळी केली. या खेळीसाठी त्याने ५ षटकार आणि ९ चौकार मारले. त्याच्या साथीला रविंद्रने १ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने ७५ धावा जोडल्या. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी धावा करणेही कठीण गेले.या डावात भारताकडून शमीने (Mohammed Shami) चमकदार कामगिरी केली. त्याने १० षटके फेकताना ५४ धावा देत न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना बाद केले. यात मिशेल आणि रविंद्रच्या विकेटचाही समावेश आहे. तर कुलदीप यादवने २ आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट काढली.मोहम्मद शमी व्यतिरिक्त विश्वचषकात भारतासाठी एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणार्‍यांची नावे आहेत कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंग, आशिष नेहरा आणि युवराज सिंग.

शमी (Mohammed Shami) वगळता बाकी सर्वांनी एकदाच असे केले आहे. शमीने पाचव्यांदा विश्वचषकात एका सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. या बाबतीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. शमीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरची बरोबरी केली. आता फक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याच्या पुढे आहे. असे त्याने सहा वेळा केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर