शमीच्या पंचसमोर न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली, भारतापुढे विजयासाठी २७४ धावांचे आव्हान

IND vs NZ World Cup Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकातील २१ वा सामना होत आहे. हा सामना भारतीय संघाला उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करुन देऊ शकतो. मात्र या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे डॅरी मिशेल आणि रचिन रविंद्र भारतीय गोलंदाजांवर भारी पडले. परंतु वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने त्यांच्या खेळींवर अंकुश लावला आणि २७३ धावांवर न्यूझीलंडला सर्वबाद केले. भारताला आता विजयासाठी २७४ धावांचे आव्हान मिळाले आहे.

न्यूझीलंडकडून मिशेलने १२७ चेंडूत १३० धावांची शानदार शतकी खेळी केली. या खेळीसाठी त्याने ५ षटकार आणि ९ चौकार मारले. त्याच्या साथीला रविंद्रने १ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने ७५ धावा जोडल्या. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी धावा करणेही कठीण गेले.

या डावात भारताकडून शमीने (Mohammed Shami) चमकदार कामगिरी केली. त्याने १० षटके फेकताना ५४ धावा देत न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना बाद केले. यात मिशेल आणि रविंद्रच्या विकेटचाही समावेश आहे. तर कुलदीप यादवने २ आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट काढली.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर