पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच महाराष्ट्रातील जनतेची पसंती; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील २१ लोकसभा मतदारसंघात महाविजय २०२४ निमित्तानं हरघर संपर्क अभियान राबविलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासाचा गोषवारा देणारं ट्विट त्यांनी आज केलं आहे. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३३ हजार ७१० मतदारांशी संवाद साधून पंतप्रधानपदाबद्दल प्रश्न विचारला, त्यापैकी ३३ हजार ६९७ मतदारांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली तर फक्त चौघांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) समर्थन दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटमध्ये काय म्हटलंय पाहुयात –
‘महाविजय २०२४ संकल्प यात्रेच्या’ निमित्तानं आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. या प्रवासात ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला आणि पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांना पसंती दिली; व केवळ १३ लोकांनी इतर पक्षातील नेत्यांना पसंती दिली. त्यातील फक्त चौघे राहुल गांधी समर्थक होते.

गेल्या साडेनऊ वर्षांत नरेंद्र मोदीजींनी केलेला विकास, जगभरात उंचावलेली भारताची मान, आत्मनिर्भर भारतासाठी केलेला संकल्प यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोदीजींच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रातील जनतेच्या याच प्रेमाच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील हा ठाम विश्वास आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’, हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र भाजपा कटिबद्ध आहे.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यांत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ – वाशीम, अकोला, बुलडाणा, अमरावती, रामटेक, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक ,बारामती, मावळ,शिरूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले, ठाणे, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात प्रवास करून जनतेशी थेट संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर