विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे घेतली धाव

Vijay Vadettiwar Death Threat: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकारामुळं त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे. एएनआयनं याबाबत माहिती दिली आहे. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविषयी काही विधानं केली होती, यामुळे त्यांना या धमक्या आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामागील नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, विजय वडेट्टीवार यांना गेल्या काही दिवसांपासून फोनवरुन मेसेजच्या स्वरुपात धमक्या येत आहेत. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे, असं एबीपी माझानं आपल्या वृत्तात लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली आहे. पण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विनंतीवर काय कार्यवाही केली हे कळू शकलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत