इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Goipchand Padalkar – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, सभा संपल्यानंतर आमदार पडळकर हे इंदापुरातील एका आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी गेले असता  शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. याच दरम्यान पडळकर तिथे आल्यावरून मराठा बांधवांकडून पडळकर यांना जाब विचारण्यात आला. त्याच दरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हे सुरु असताना त्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्यात आली, अशी माहिती आहे.

दरम्यान, झी २४ तास ने दिलेल्या वृत्तानुसार, इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचे वृत्त गोपीचंद पडळकर यांनी फेटाळले आहे. असं काही घडलं नसल्याचे पडाळकर म्हणाले. मी तेथून गेल्यानंतर घोषणाबाजी झाली की काय झाले ते मला माहित नाही असा खुलासा पडाळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki