सारा तेंडुलकरसोबत मांडीला मांडी लावून बसलेला तो व्यक्ती कोण? ‘मिस्ट्री मॅन’ची चर्चा

Sara Tendulkar in Pune Match, ODI World Cup : एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) 17वा सामना प्रबळ दावेदार भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात पुण्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान महान फलंदाज सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) स्टँडमध्ये दिसली. तिच्यासोबत एक व्यक्तीही बसली होती. या चेहऱ्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्यक्ती कोण आहे?, त्याचे सारासोबतचे नाते काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

‘मिस्ट्री मॅन’सोबत सारा दिसली
दरम्यान, सचिनची मुलगी सारा तेंडुलकर ही स्टँडमध्ये दिसली. सारासोबत एक व्यक्ती बसली होती. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल सोशल मीडियावर काही युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने त्याला जुगनू म्हटले तर कोणी लिहिले की ही व्यक्ती शुभमन गिलचा सर्वात चांगला मित्र केपी औलख आहे.

 

दरम्यान भारताचा शानदार सलामीवीर शुभमन गिलने गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) वनडे विश्वचषक-2023 सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 53 धावांची खेळी खेळली. भारतीय संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला. चालू विश्वचषकात भारताचा हा सलग चौथा विजय आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर