IND vs PAK | भारताविरुद्धच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, रोहित शर्माने केलं शांत

रविवारी खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या कट्टर लढतीत भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी (IND vs PAK) पराभव केला. टीम इंडियाविरुद्धचा अत्यंत जवळचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह मैदानावरच रडू लागला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला रडताना पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याला शांत केले. पाकिस्तानसमोर विजयासाठी 120 धावांचे सोपे लक्ष्य होते, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी (IND vs PAK) संघाला 113 धावांवर रोखले.

भारताकडून सामना हरल्यानंतर पाक क्रिकेटपटू ढसाढसा रडू लागला
पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 18 धावांची गरज होती. त्यावेळी पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि नसीम शाह क्रीजवर उपस्थित होते. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमला (15 धावा) बाद करून पाकिस्तानच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. यानंतर नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानला विजयापर्यंत नेण्याची संधी होती. नसीम शाहनेही शेवटच्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर लागोपाठ दोन चौकार मारले, पण तरीही पाकिस्तानने सामना गमावला.

रोहित शर्माने शांत केले
अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात आपली जादू दाखवत शेवटच्या षटकात केवळ 11 धावा दिल्या. भारताविरुद्धचा सामना 6 धावांनी हरल्यानंतर नसीम शाह अचानक रडायला लागला. शाहीन शाह आफ्रिदीने नसीम शाहच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही नसीम शाहच्या खांद्यावर हात ठेवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. नसीम शाह याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!