Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?

Shiv Sena UBT Lok Sabha Canditate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Mumbai LokSabha) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईतील सहापैकी 4 जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मुंबई (Mumbai LokSabha) हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई असे समीकरण आहे. त्यामुळे मुंबईतील सहा पैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत.

मुंबई – ईशान्य-संजय दिना पाटील
मुंबई – दक्षिण-अरविंद सावंत
मुंबई – वायव्य-अमोल कीर्तिकर
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई

त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळू शकते. तसेच मुंबईतील काही जागा भाजपाकडे जाण्याचीही शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार