टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 2र्‍या वनडेत 2 गडी राखून पराभव केला, अक्षर पटेलचे झंझावाती अर्धशतक

नवी दिल्ली – भारताने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलने (Akshar Patel) चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन (Shreyas Iyer and Sanju Samson) यांनी अर्धशतके झळकावली. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) गोलंदाजीत अप्रतिम 3 बळी घेतले.

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल (Shikhar Dhawan and Shubman Gill) सलामीला आले. यादरम्यान धवन अवघ्या 13 धावा करून बाद झाला. तर शुभमनने 49 चेंडूत 43 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकारांचाही समावेश होता. श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याने 71 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

संजू सॅमसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. दीपक हुडाने (Deepak Hooda) 36 चेंडूत 33 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता. शार्दुल ठाकूर अवघ्या 3 धावा करून बाद झाला. आवेश खानने 10 धावांचे योगदान दिले. त्याने 2 चौकारही मारले.

दरम्यान,  अक्षर पटेलने यात सर्वात उत्तम काम केले. त्याने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अक्षरने 35 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. भारताने हे लक्ष्य ४९.४ षटकात पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. यादरम्यान शाई होपने (Shai Hope) शतक झळकावले. त्याने 135 चेंडूत 115 धावा केल्या. होपच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर निकोलस पूरनने 77 चेंडूत 74 धावा केल्या. पूरनने 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. मेयर्सने ३९ आणि ब्रुक्सने ३५ धावांचे योगदान दिले. पॉवेल 13 धावा करून बाद झाला.

यादरम्यान शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. तर दीपक हुडाने 9 षटकात 42 धावा देत एक विकेट घेतली. अक्षर पटेलने 9 षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली. युझवेंद्र चहलनेही (Yuzvendra Chahal) एक विकेट घेतली. आवेश खान आणि मोहम्मद सिराज (Avesh Khan and Mohammad Siraj) यांना एकही यश मिळाले नाही. सिराजने 10 षटकात 47 धावा दिल्या.