दमबाजी करणाऱ्या शरद पोंक्षेंवर गुन्हा दाखल करा, सचिन खरात यांची मागणी

पुणे – सावरकर (Savarkar) नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत, आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं अभिनेते शरद पोक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी म्हटलं आहे. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्यावतीने ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी हे वक्तव्य केले आहे.

जेव्हा ८० टक्के हिंदुंना दुखवायचं असले, ८० टक्के हिंदुंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज (Hindu society) दुखावतो इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती, काँग्रेसला होती आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

यावरून आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी शरद पोंक्षे यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात अशी दमबाजी चालणार नाही. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचेच आहे हे शरद पोंक्षे यांनी ध्यानात ठेवावे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेEknath Shindeयांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. पोंक्षे यांचे वक्तव्य अत्यंत नींदनीय असल्याचं खरात यांनी म्हटलंय.